वरली मटका अंक आकड्यांचा जुगार कायद्यांतर्गत रेड
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत
पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे डीबी पथकातील अंमलदार व टाऊन अंमलदार हे पोहेका मिलिंद जंजाळ पृथ्वीराज इंगळे उमेश भारसाकडे, रवी झगरे, रवी साळवे हे नांदुरा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी नामे मनोज गजानन बासोडे वय 40 वर्ष रामनगर नांदुरा हा जनता चौकामधे एका वायरच्या थैलीमध्ये 90 एमल मापाच्या 30 नग शीशा किमती 1070 रुपयाच्या विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना अवैधरित्या जवळ बाळगताना मिळून आला नमूद आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 118/2024 कलम 65 (ई)म.दा.का प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आरोपी नामे फिरोज खान हबीब खान वय 39 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 18 सायकल पुरा नांदुरा हा मीहाणि वाईन शॉपी चे समोर सार्वजनिक रोडवर वरली मटका अंक आकड्यांचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला वरून त्याच्यावर जुगार कायद्यांतर्गत रेड कारवाई केली असता त्याचे कब्जातून नगदी 1750 रुपये एक वरली मटका अंक आकडे लिहिलेली चिठ्ठी व एक डॉट पेन किमती पाच रुपये असा एकूण 1755 मुद्देमाल मिळून आला नमूद आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 117/2024 कलम 12 (अ)मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.