साधूंकडे मानापमान नसतो परंतू साधूंच्या अपमानाचे दुष्परिणाम भोगावे लागतातच : दिपकजी शास्त्री अमरगड
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम):-
साधू संत ह्यांना मान आणि अपमान समानच असतात. इतरांनी त्यांचा अपमान केला तरी साधू दुःखी होत नाही किंवा मान दिल्याने सूखी होत नाही. परंतू साधू व्यक्तीचा अपमान अनावधानाने जरी झाला तर त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. त्यामुळे साधूसंतांचा अनावधानानेदेखिल अपमानहोणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. कपिल मुनिंच आपल्या आईला म्हणजेच देवहुतीला उपदेश सांगतांना मनाबद्दल शास्त्रीजी सोप्या भाषेत व्यक्त होतात की, सर्व गोष्टीला मन कारणीभूत असते. सुख-दुःख, मोक्षप्राप्ती आणि नरकयातना भोगण्यासाठी पण मनच जबाबदार ठरतो. कारण मन हा पाच ज्ञानेद्रिय आणि पाच कर्मेंद्रीय यांचा राजा आहे. शरीराची केवळ कृती दिसते परंतु मन मात्र सर्व गोष्टी करत असतो, शरीर हा नाममात्र आहे.
तालुक्यांतील तिर्थक्षेत्रापैकी वाईगौळ येथील महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा संस्थान हे महत्त्वाचे आहे. महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा यांनी १९६६ साली षटतिला एकादशीला सर्व भक्तांसमक्ष संजीवन समाधी घेतली होती. त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचीत्य साधुन दिनांक ३१ जानेवारी पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे.
आजच्या दिवशी पितामह भीष्म आख्यान, कलीकालाचे महत्त्व, परिक्षीत राजा जन्मकथा, कलीपुरुषाचे परिक्षीत राजात शरीर प्रवेश, जगाच्या उत्पत्तीची कथा, मनू राजा कथा, भगवान शंकर आणि माता सती विवाह कथा सर्व भक्तांना कळेल अशा अत्यंत सोप्या शब्दात विशद केल्याने सर्व भक्त उत्साहाने कथा श्रवणाचा आनंद घेत आहे