Breaking News
recent

तरूणीच्या अश्लील चित्रीकरणाचे मेमरीकार्ड वितरण करणाऱ्या विरोधात गुन्हा; चित्रीकरणाद्वारे धमकावून अनेकवेळा बलात्कार


 मुंबई : बावीस वर्षीय तरूणीचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करून त्या बदल्यात तिच्यावर अनेकवेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरूणीने आरोपीच्या मागण्यांना नकार दिल्यानंतर आरोपीने चित्रीकरण असलेले मेमरी कार्ड व व्हॉट्सअॅप संभाषणाचे प्रिंटआऊट पीडित तरूणीच्या सोसायटीमधील प्रत्येक घरासमोर ठेवले होते.

गुरवैया बुसिरासी (४१) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ वर्षीय तरूणी नवी मुंबईतील रहिवासी आहे. ती आरोपींना पूर्वीपासून ओळखते. दोघे २०१९ मध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यावेळी ते एकमेकांना भेटायचे. आरोपीने फेब्रुवारी २०१९ मध्ये पीडित तरूणीला एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली व त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. तसेच तो अनेकवेळा पीडित तरूणीला धमकावत होता. त्याला नकार दिला असता आरोपीने तिच्या सोसायटीमधील सर्व घरांच्या दरवाज्यांसमोर लिफाफे ठेवले. त्यात तरूणीचे खासगी चित्रीकरण असलेले मेमरी कार्ड व व्हॉट्सअॅप चॅटचे प्रिन्टआऊट होते. तसेच त्या लिफाफ्यामध्ये तरूणीबद्दल अश्लील गोष्टी लिहून तिची बदनामी केली.याप्रकरणानंतर तक्रारदार तरूणी मानसिक दडपणाखाली होती, बदनामीमुळे ती घाबरली होती आणि तिने या प्रकरणाची त्वरित पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र आरोपी तिचा छळ करत राहिल्याने अखेर तिने रविवारी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७६(२)(एन), ३८४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना प्रथम साकीनाका येथे घडली असल्याने साकीनाका पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Powered by Blogger.