Breaking News
recent

वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

 


 नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील 

श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन व सिनिअर कॉलेज नांदुरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन व  सिनिअर कॉलेज नांदुरा येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाशचंदजी झांबड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. नां. चैनसुखजी संचेती व नांदुरा तालुक्याचे तहसीलदार श्री डिगांबरजी मुकुंदे, संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाताई झांबड, डॉ राजेंद्र गोठी, डॉ सचिनजी बक्षी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुभा मंत्री व सिनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक जागृतजी वाघमारे उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व द्विप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  शाळेतील तसेच सिनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने संस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच कार्यक्रमाचे उत्तमरित्या सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ.  शुभांगी आगरकर, सौ.  शुभांगी कांबळें व शाळेतील विद्यार्थ्यांनी केले, विद्यार्थ्यांनी नाटिका व नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.पालकांनी उपस्थित राहुन आपल्या पाल्याचा उत्साह वाढवला

Powered by Blogger.