युक्रांद आयोजित गोळा फेक स्पर्धेत कानडे छत्रपती, सुरेखा आडे विजेते
बीड (प्रतिनिधी)
स्वराज्यरक्षक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी 2024 रोजी रविवार रोजी युवक क्रांती दलाकडून गोळा फेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा.सुशीलाताई मोराळे, बीड शहराचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पी.पी.दलाई, पोलीस निरीक्षक गायकवाड, शेख निजाम, दादासाहेब मुंडे, अशोक तावरे, मकरंद उबाळे, बळीराम गवते, फौजी सय्यद, डॉ.पाखरे, डॉ.तांदळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी गोळा फेक स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये कानडे छत्रपती याने 11.75 मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक मिळविला. युवतींमध्ये सुरेखा आडे हिने 9.50 मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे आयोजक युक्रांदचे जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित तुपे हे होते.
ही स्पर्धा ही बीड येथील आय.टी.आय.ग्राउंडवर आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत 90 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला, स्पर्धेत द्वितीय क्रमांक युवराज पवार तृतीय क्रमांक अजीनाथ कदरे यांनी मिळविला. युवतींमध्ये द्वितीय क्रमांक साक्षी कांबळे आणि तृतीय क्रमांक कोमल चौरे यांनी मिळविला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कळसाने, भिमाशंकर यादव, प्रदिप मस्के, गिराम सर, प्रा.घोरपडे, प्रा.कृष्णा जाधव, शाहीर अनिल तिवारी , मधुकर काळे, अनिरुद्ध काळे, अल्का बेद्रे, शिवलिंग प्रभाळे, कृष्णा भडके, वायकर, सुरज तुपे, रमेश पिंगळे, संजय नवले यांनी सहकार्य केले