शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यात मोताळा येथील सभेसाठी मलकापुर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे... वसंतराव भोजने
मलकापुर:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यादरम्यान दि.22 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या सभेसाठी मलकापुर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक विश्रामगृहावर आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित बैठकीत मलकापुर विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दिपक चांभारे, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड,रविंद्र गव्हाळे, लक्ष्मण दोळे, नासिर भैया, यासीन कुरेशी, रामराव तळेकर, राजेंद्र काजळे, दीपक कोथळकर,शे.वसीम लकी, नवाज भाई,सोहीलभाई ,सोहील जमदार,शे.अनिस,साबीरखान,अक्षय अल्ताफ,राजाभाई कुरेशी,चाॅंद चव्हाण जावेद भाई, अर्जुन कुयटे, गजानन ऊंबरकार, नंदकिशोर मावळे सह आदि पदाधिकारी व शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती होती.
दि.22 फेब्रुवारी गुरुवार रोजी मोताळा येथे दुपारी 3 वाजता होणाऱ्या सभेसाठी मलकापुर शहर व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख भोजने यांनी केले तसेच मलकापुर ते मोताळा येथे जाण्यायेण्याठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी दिली आहे.