खामगाव कृ.ऊ बाजार समितीला शेतकरी कन्या पुत्र शैक्षणिक क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याची केली विनंती
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळींची दिनांक ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी कन्यापुत्र एमपीएससी यूपीएससी शेतकरी विकास क्रांती संघटनेच्या नांदुरा येथील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. तसेच बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या मनोबल शेतकरी कन्यापुत्र अभ्यासीकेला सुद्धा भेट देत अभ्यासिकेच्या उपक्रमाविषयी व तेथील सोयीसुविधा विषयी कौतुक करून खामगाव कृ ऊ बा समितीच्या सर्व संचालकांचे अभिनंदन व स्वागत केले.यावेळी मनोबल शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना एक वेळ जेवण देण्याविषयी चर्चा करून त्यांना जेवण देण्याची विनंती केली.यावेळी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पैसोडे,उपसभापती जाधव साहेब,सचिव गजानन आमले,व संचालक मंगेश इंगळे यांनी सुद्धा याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही यावर लवकर निर्णय घेऊ असे सांगितले.तसेच खामगाव कृ ऊ बा समितीचे अंतर्गत असलेल्या पिंपळगाव राजा येथील उप बाजार समिती मध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचे सूतोवाच केले.यावेळी शेतकरी कन्या पुत्र शैक्षणिक क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष कोमल ताई तायडे,शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे,प्रा वा वी भगत,अनंत वदोडे,विजय गावंडे,लहू बिचारे यासह पदाधिकारी उपस्थित होते.