शिवजयंती निमित्त दुध वाटप कार्यक्रम
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त,निघालेल्या रैली मध्ये नांदुरा नगरीचे वैभव असलेल्या 105 फूट हनुमान मूर्ती समोर तरुणांनी वाईट व्यसना पासुन दुर राहावे व तरुणांनी सशक्त व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, मराठा पाटील युवक समिती नांदुरा यांच्या वतीने,रैली मध्ये सहभागी असलेल्या सर्व शिवप्रेमी बंधु आणि भगिनींना शुद्ध आणि पौष्टिक असे केशर युक्त दुध वाटप कार्यक्रम राबवण्यात आला.या वेळी नांदुरा नगरीचे शिस्त प्रिय ठाणेदार श्री.विलास पाटील यांच्या हस्ते दुध वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी मराठा पाटील युवक समिती चे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविण ऊर्फ छोटू पाटील, शहर अध्यक्ष श्री.कपिल पाटील,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मनस्कर, विष्णु बाठे,राहुल घाटे,अतुल गव्हाळ,वैभव खराटे,गौरव घोराडे,प्रणव गावंडे, प्रितेश गावंडे,वैभव धांडे, भागिराथ मनसकर,शुभम चांभारे,दिपक पाटील, उध्दव सर गावंडे, प्रफुल्ल बिचारे, डॉ.शरद पाटील, प्रमोद हिवाळे,पंकज ठाकरे,अनिकेत भगत,विजय गावंडे, बबलु धांडे, दिपक कोल्हे, लक्ष्मण वक्ते,प्रदिप मनसकर,निलेश कोळस्कर, व इतर अनेक सदस्य व असंख्य शिव प्रेमी बंधु आणि भगिनींची उपस्थिती होती