Breaking News
recent

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव सोहळा



  नांदुरा : प्रतिनिधी प्रशांत पाटील 

.सालाबादा प्रमाणे यंदाही जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जयंती सोहळ्याचे शहरात आयोजन करण्यात आलेले आहे.   याबाबत अधिक वृत्त असे की, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीचे वतीने शुक्रवार दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी शहरातील श्री संत जंगली महाराज नगर, दुध डेअरी रोड येथे आयोजीत करण्यात आलेला आहे,

    नियोजीत कार्यक्रमानुसार सकाळी १० वाजता श्री संत जंगली महाराज लॉयन्स  नेत्रालय मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.  त्यानंतर  दुपारी ३ वाजता जगदगुरू तुकोबांची गाथा प्रदक्षिणा व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आले. 

सायंकाळी ६ वाजता ऊत्सवस्थळी दिंडी सोहळा आगमन झाल्यावर  आ. राजेशभाऊ एकडे यांच्या हस्ते जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या प्रतिमापुजन तसेच महाआरती करण्यात येईल.त्यानंतर महाप्रसाद वितरणाने जयंती ऊत्सवाची सांगता होईल.  

    सदर ऊत्सव प्रसंगी नांदुरा पंचक्रोशीतील  टाळकरी, माळकरी,वारकरी,गायनाचार्य व भाविक बंधुभगिनींनी  जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती सोहळ्यात सहभागी होऊन भगवत भक्तीचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन श्री संत तुकाराम महाराज  सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे वतीने करण्यात आलेले आहे अशी माहीती शाम अत्तरकर यांनी एका प्रसिध्दीपत्राद्वारे दिली आहे.

Powered by Blogger.