जवळा येथील शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच भेट व मार्गदर्शन
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला अभ्यासाची आवड लागावी तसेच शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका व एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी अभ्यासिका सुरू होत आहे. नुकतीच जवळा (बेलुरा) येथे सुरू झालेल्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेला शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका व एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेच्या वतीने 28 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळा येथे झालेल्या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला .
यावेळी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे ,वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री जायले साहेब,प्रा वा वि भगत,अनिल शिंगोटे,सरपंच सुनिल शिंगोटे,सुरेश शिंगोटे, विश्वंभर बहुरूपे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग राजपूत,दैनिक भास्करचे नांदुरा शहर प्रतिनिधी लक्ष्मण वक्ते,पद्माकर ढोले,अक्षय हेलगे,अक्षय बोचरे, गजानन शिंगोटे,अशोक डीवरे, श्रीराम इंगळे ,प्रभाकर शिंगोटे, राजेश इलामे, उमेश शिंगोटे ,रामदास पातूर्डे ,प्रमोद इंगळे तसेच विद्यार्थी पालक वर्ग व गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. वडनेरे पोलीस स्टेशनचे एपीआय श्री जायले साहेब यांनी स्पर्धा परीक्षेसंबंधी उपस्थित विद्यार्थी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले .प्रा वा वी भगत व अक्षय बोचरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करीत आपली मनोगते व्यक्त केली.आणि जवळा गावचे सरपंच आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.गौरव मानकर याने या कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.
(शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका व mpsc, upsc शैक्षणिक क्रांती संघटनेच्या माध्यमातून नांदुरा कृ ऊ बा स नांदुरा येथे 2 ऑक्टोंबर १५ पासून सुरू असलेल्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेतून आजपर्यंत 180 शेतकऱ्यांच्या मुले,मुली शासकीय नोकरीत लागले आहे, म्हणून शासनाने याची दखल घेऊन हा पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्या,ग्रामपंचायती,धार्मिक संस्थांनानी सुरू करावा यासाठी शासनाकडे एक लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे . --राजेश गावंडे. शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते)