पोलीस स्टेशन नांदुरा येथे पोलीस पाटील यांची मिटींग
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
आज दिनांक 11/03/2024 रोजी 11.30 ते 13.00 वा. दरम्यान पोलीस स्टेशन नांदुरा येथे पोलीस पाटील यांची मिटींग घेण्यात आली. मिटींग दरम्यान पोलीस पाटील यांना आपल्या गावात तसेच प्रभार असलेल्या कोणतेही गावात अवैधरीत्या कोणत्याही थोर महापुरुषांचे पुतळ्याची स्थापना होणार नाही तसेच बाबत कोणत्याही प्रकारचे आगाऊ माहिती मिळतात पोलीस स्टेशनला द्यावी. आगामी लोकसभा व सन उत्सव संबंधाने कोणत्याही ठिकाणी काही वाद होण्याची शक्यता असल्यास त्याबाबतची आगाऊ माहिती पोलीस स्टेशनला द्यावी, अवैध धंदेवाईक यांचे विषयी माहिती ठेवून त्यांचे नावाची यादी द्यावी.
गावांमध्ये काही गुंड दादागिरी करणारे लोकांची माहिती द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच ईतर कोणत्याही गावातील जयंती मिरवणूक, उत्सव दरम्यान दरम्यान स्वतः त्या ठिकाणी हजर राहावे तसेच डीजे या वाद्यास परवानगी नाही याची पूर्वकल्पना आयोजक यांना द्यावी. ग्राम सुरक्षा दल/ पोलीस मित्र यांचे संपर्कात राहून व त्यांना सतर्क ठेवून गावामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही या दृष्टीने त्यांचे नेहमी संपर्कात राहावे. गावांमध्ये आवश्यक त्या रहदारीच्या प्रमुख मार्गावर सि.सि. टी. व्ही. कॅमेरे बसविण्या करीता प्रयत्न करावे. प्रमाणे आवश्यक ती माहिती देण्यात आली. तसेच त्यांचे कडुन मिळालेली माहिती नोंद करून घेतली. मिटींग करीता 28 पोलीस पाटील हजर होते.