Breaking News
recent

गुजरात राज्यातून पुणे या ठिकाणी विक्रीसाठी जाणारी सुगंधित तंबाखू अहमदनगर शहरमध्ये जप्त:- स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई



अहमदनगर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-अहमदनगर पोलीस अधीक्षक मा.श्री.राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोनि/ श्री.दिनेश आहेर ज्यांना जिल्ह्यातील अवैध  धंद्याची माहिती काढून अवैध धंदेचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश  दिलेले आहेत आदेशान्वये पोनि/ श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अमलदार संतोष लोढे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख ,रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे ,प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून त्यांना अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रावांना केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०२.०३.२०२४ रोजी अहमदनगर शहरांमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोनि/ श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे अशोक बाबासाहेब जावळे रा. बीड हा त्याच्या ताब्यातील पांढरा रंगाचा  टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात   विक्रीसाठी  प्रतिबंधित  असलेली व  शरीरास अपायकारक होईन असा खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू हे गुजरात राज्यातून पुणे या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर बातमीची हकीगत पोनि/ श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती  पथकास कळवुन सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारे टेम्पोवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले वरील पथक अहमदनगर मनमाड जाणारे रोडवर सावेडी नाका या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबलेले असता त्यांना बातमीतील वाहन  दिसल्याने सदर वाहन चालकास थांबून टेम्पो मधील मालाची खात्री करता सदर टेम्पो मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली व शरीरास अपायकारक होईन असा खाद्यपदार्थ सुगंधी तंबाखू मिळून आली सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अशोक बाबासाहेब जावळे वय ३३ वर्ष  रा. जवळाला ता. पाटोदा जि. बीड असे असल्याचे सांगितले सदर मिळून आलेल्या  तंबाखू बाबत टेम्पो चालकास अधिक विचारपूस करता त्याने सदरची सुगंधित तंबाखू ही १) सुरेंद्र प्रसाद रा.सेक्टर ६६ नोएडा दिल्ली २) वसीम शेख रा.अहमदाबाद गुजरात ३) चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात यांनी टेम्पोमध्ये भरून देऊन ती विक्री करता पुणे या ठिकाणी पाठवण्या असल्याचे सांगितले ताब्यात  घेण्यात आलेल्या टेम्पो ८,३०,००० रुपये किमतीची ८३० किलो सुगंधित तंबाखू तसेच ८,००,००० रुपये किमतीचा टेम्पो क्रमांक एम एच 14 के क्यु ९१७४ असा एकूण १६,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेला इसम १) अशोक बाबासाहेब जावळे २) सुरेंद्र प्रसाद नोएडा दिल्ली फरार ३) वसीम शेख आमदाबाद गुजरात फरार ४)चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात फरार यांच्याविरुद्ध पोकॉ/२६०० तोफखाना पोलीस स्टेशन गु. र. नं. २८९/२०२४ भादवि कलम ३२८.१८८.२७२.२७३.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे


Powered by Blogger.