भूमिपूजन सोहळा संपन्न
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा (बा.) येथील श्री. खोटेश्वर महाराज पालखी मार्ग बांधकाम करण्याकरिता मा.खा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेबानी प्रादेशिक पर्यटन विकास विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर केला. त्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर सभापती श्री. शांतारामजी दाणे पाटील यांनी केले. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते पांडुरंगजी हागे, श्री. खोटेश्र्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्रजी ढगे, भाजपा तालुका अध्यक्ष लोकेशजी राठी, भाजपा जिल्हा सदस्य सुधाकरजी शेजोळे, मा. तालुका अध्यक्ष डॉ. गणेशजी दातीर, विधानसभा संयोजक पवनजी अस्वार, तालुका सरचिटणीस संजयजी उमाळे, ओ.बी.सी. जिल्हा सदस्य विनोद माळोकार, भास्कर धुळे , गावातील नागरिक व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.