Breaking News
recent

आदर्श उज्वल महिला प्रभाग संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



      ▪️आज दिनांक 10 मार्च २०२४ रोजी दाताळा उमाळी प्रभागातील   * उज्वल महिला   प्रभागसंघ"*  वार्षिक सभेचे आयोजन श्री. वियोगी महाराज आश्रम,  माकनेर रोड उमाळी तालुका मलकापूर येथे आयोजित करण्यात आली होती.

💥 *सभेचे विशेष आकर्षण* 💥

▪️सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला गावातून सर्व कॅडर,महिला ची प्रभात फेरी काढण्यात आली गावातून फेरी दरम्यान ' उमेद ' अभियानचे नारे देऊन महिलांनी शांततेत गावातून फेरी मध्ये सहभाग घेतला सोबत तालुका कक्ष कर्मचारी होते.

*दीपप्रज्वलन*

▪️प्रभात फेरी नंतर सभामंडपात महिला उपस्थित झाल्या आणि वार्षिक सभा सुरू करण्यात आली प्रतिमा पूजन आणि मान्यवरांचे स्वागत करून सभेस सुरुवात करण्यात आली 

▪️ प्रतिमा पुजनानंतर व स्वागत समारंभानंतर  प्रभागसंघाचा लेखाजोखा  लिपिकाताई यांनी  उपस्थितांसमोर मांडला. सचिव यांनी आतापर्यंत सर्व सभासदाच्या सहकार्याने ग्रामसंघाच्या सुरु असलेल्या वाटचालीबद्दल उलगडा केला. उपस्थित कॅडर आणि समूहातील महिला यांनी आपली यशोगाथा यांनी आपल्या भाषणातुन मासंगितली, महिला  बँकेच्या योजना बद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त समुहांनी व्यवसाय सुरू करावा याबद्दल मार्गदर्शन श्री तऱ्हेकर सर यांनी महिलांना केले.


 ▪️ मुद्रा लोनबद्दल माहिती दिली उदयोग व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती दिली तालुका व्यवस्थापक राठोड सर यांनी गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ,उपसमीती,,ग्रामसंघाला मिळणारे निधी, परतफेड,सविस्तर माहिती दिली . उपस्थित सर्व महिलांनी उपजिवीकेची साधन वाढवुन आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे याविषयावर महिलांशी संवाद साधला. सिआरपी व यशस्वी उद्योजक ताईंनी प्रसंगी आपली मनोगत व्यक्त केली.

💥 *विशेष मार्गदर्शन*💥

▪️ सदर वार्षिक सभेस जिल्हा व्यवस्थापक (DM IBCB) श्री.चंद्रशेखर तऱ्हेकर सर,जिल्हा व्यवस्थापक (DM MIS )श्री.अविनाश वांदीले सर  ,तालुका अभियान मोताळा  तालुक्यातील तालुका श्री.चव्हाण सर(BMIBCB), उमाळी गावाचे   मा.सरपंच  गुलाब हुसेन साहेब तालुका मलकापूर श्री.  ढोक सर (BMMU) तालुका मलकापूरश्री.राठोड सर(BMIBCB) प्रभाग  समन्वयक नरवेल धरणगाव सर्कल मधले श्री.मंगेश हिंगणे सर तसेच देवधाबा वाकोडी सर्कल सौ.  दुर्गा इंगळे मॅडम कुंता सर्याम  प्रभाग समन्वयक  तसेच उज्वल  प्रभागसंघ पदाधिकारी, सर्व कार्यकारणी सदस्य ,लिपीका, बँक सखी, आयसिआरपी ( ICRP) आणि समुहातील महिलां उपस्थितीत होत्या. शेवटी तालुका व्यवस्थापक श्री राठोड सर  यांनी आभार प्रदर्शन केले.उपस्थित सर्व महिला आणि कर्मचारी यांची भोजन व्यवस्था सदर उज्वल महिला प्रभाग संघ  महिला प्रभागसंघा कडून करण्यात आली होती अशा पद्धतीने वार्षिक सभा संपन्न झाली

Powered by Blogger.