घिर्णी येथे वंचित बहुजन आघाडी च्या फलकाचे अनावरण
घिर्णी येथे दि . १२/०३/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण व शाखा स्थापन करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा सचिव आतिशभाई खराटे तर प्रमुख व्यक्ती म्हणून जि .अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे जि .उपाध्यक्ष यशवंतराव कळासे जि . संघटक भाऊराव उमाळे जि . सचिव तुळशीराम वाघ जि . संघटक वसंतराव तायडे ता .अध्यक्ष सुशील मोरे शहर अध्यक्ष अजय सावळे ता उपाध्यक्ष गजानन झनके ता युवा उपाध्यक्ष अनिल तायडे ता.सचिव गणेश सावळे ता .उपाध्यक्ष भीमराव नितोने उपस्थित होते . यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले त्यानंतर सभेमध्ये रूपांतर तर यावेळी सर्व नेत्यांची भाषणे झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी सुशीलभाऊ मोरे हे होते यावेळी घिर्णी शाखा अध्यक्ष म्हणून आकाश इंगळे तर उपाध्यक्ष पदी अरुण इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ता . संघटक अजाबराव वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन भिकाजी तायडे यांनी केले . कार्यक्रमाला गावकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला अशा प्रकारची माहिती सुधाकर तायडे यांनी दिली.