ई.व्ही.एम हटावसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )
श्रीरामपूर : ई.व्ही.एम.ने मतांची किंमत शून्य केली असून याद्वारे निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगामी सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रगत देशांत ई.व्ही.एम बंद करून पारंपरिक पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या जातात. मात्र देशभरात ईव्हीएमला विरोध होत असतानाही भारत निवडणूक आयोग ईव्हीएमवर निवडणूका घेण्यासाठी का उतावीळ आहे असा सवाल आंदोलन कर्त्यांच्या वतीने विचारण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या सर्व सार्वत्रिक निवडणूका या बॅलेट पेपरवर घ्याव्या अन्यथा प्रत्येक मतदान केंद्रावर 'ईव्हीएम फोडो' आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आंदोलनास भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अशोक मामा थोरे, अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी , शफीभाई शहा, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार, काँग्रेसचे ॲड. समीन बागवान, भगतसिंग ब्रिगेडचे कॉ. जीवन सुरडे, वंचित बहुजन आघाडीचे सुनिल ब्राम्हणे, बामसेफचे आर.एम. धनवडे, बहुजन मुक्ती पक्षाचे एस. के. चौदंते, पी.एस.निकम, प्रताप देवरे अशोकराव दिवे, डॉ. सलिम शेख , एम. एस. गायकवाड, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव फ्रान्सिस शेळके,विद्रोहीचे अमोल सोनवणे, पोपट खरात, जी. जे. शेलार, तुकाराम धनवडे, एस.के. बागुल, श्रीकृष्ण बडाख, एफ. एम. वाघमारे, आनंदराव मेढे, विठ्ठलराव गालफाडे, वसंत लोखंडे, एन. एम. पगारे, अंतोन शेळके, संतोष गायकवाड, सुधाकर भोसले, प्रभाकर जऱ्हाड, माणिकराव फोफसे, भागवत विधाते, इरफान बागवान, वसिम बागवान, चांगदेव विधाते, स्वाती बनसोडे, वैशाली बागुल, मनिषा ब्राम्हणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले तर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारले.