देशी दारु बाळगणाऱ्यावर कारवाई
नांदुराः दिनांक १८/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस अंमलदार पो ना शैलेश बहादुरकर, पो का रवी झग्रे, पोका विनायक मानकर, यांना मिळालेल्या खबरे प्रमाणे नांदुरा टाऊन येथे आरोपी नामे विठ्ठल समाधान धामोडे वय ५७वर्ष रा दहिगाव तालुका नांदुरा यांचेवर प्रो वी रेह करून त्याचे कडून एका थैलीमध्ये देशी दारू टॅगो पंच ९० मिली कंपनीच्या नग ५० शीशा किमती १४२०/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.