भीमनगर परिसरातील घरामध्ये एक्का बादशाह जुगार खेळणाऱ्या सात आरोपींवर छापेमारी
१८ मार्च २०२४ रोजी नांदुरा पोलिस निरीक्षक विलास पाटील याना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर खबर मिळाली की भीमनगर मध्ये राहणारे पुरुषोत्तम पांडुरंग दळवी यांच्या घरात जुगार एक्का बादशाह जुगारतर पैसे लावून हारजीत केली जात आहे त्यावरुण दोन पंचा समक्ष छापा मारला असता घटनास्थळी जुगार खेळणारे आरोपी पुरुषोत्तम पांडुरंग दळवी रा भीमनगर अमोल पुरुषोत्तम दळवी विष्णु सापुडी धोरण कैलास संपत इंगळे संतोष भगवान वानखेड़े सय्यद ईसाक सय्यद गफूर मोहम्मद आबिद फहीम शेख या सर्व आरोपी जवळून घटनास्थळी नगदी ५६७० रूपये दोन मोटारसायकल किंमत ५०००० रुपये दोन मोबाइल किंमत १२००० रूपये असा ६८१७० रुपयाचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करुण वरील सात आरोपी विरुद्ध म्हाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयानवाये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो हवा पृथ्वीराज इंगले हे करित आहेत सदर कार्यवाही नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पाटील, पो. हवा इंगले, पो हवा, राहुल - ससाने, कैलास सुरडकर, यानी केली आहे.