ओबीसी समाजाने लोकसभेला उमेदवार उभा करावा. विजय निश्चित .
श्रीगोंदा (अनिल तुपे )
नगर दक्षिण मधुन लोकसभेसाठी ओबीसी,बहुजन, दलित भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक यापैकी एक उमेदवार उभा केला तर विजय निश्चित होऊ शकतो. कारण भाजपा ने विद्दमान खासदार यांना उमेदवारी दिली. जनता त्यान्च्या कामावर नाराज आहे. तर दुसरा उमेदवार हा राष्ट्रवादी शरद पवार गटा चा असणार आहे.हे उमेदवार असल्यामुळे दोघांच्या मतांच विभाजना होऊन ओबीसी, उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, ओबीसी चे नेते जरी आघाडी मद्दे असले तरी ते ओबीसी उमेदवार यांना आतल्या हाताने मदत करू शकतात. दलित, अल्पसंख्यांक, व भटक्या, जाती, तसेच ओबीसी, मतदार नगर दक्षिण मद्धे ७०टक्के आहेत. त्या मुळे ओबीसी उमेदवार यांना निवडून येणे कायच अवघड नाही. नगर दक्षिण मद्दे भाजपा, शिवसेना (शिंदे गट )व राष्ट्रवादी (अजित पवार गट )यांच्या युती तील विद्दमान खासदार सुजय विखे यांना तिकीट फायनल झाले आहे. त्यान्च्या विरोधात पारनेरचे विद्दमान आमदार निलेश लंके उभे राहाणार आहेत. हे जवळ जवळ फायनल आहे. त्या मुळे या दोन्ही उमेदवार यांच्या मतांची विभागणी होऊन ओबीसी उमेदवार सहजपणे खासदार होऊ शकतो.
सोशल मीडिया च्या माद्यमातून अनेक ग्रुप वर पर्सनल प्रश्न विचारला होता त्यामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग घेतला आणि त्यातील ९० टक्के लोकांनी होय लोकसभेला ओबीसी,बहुजन, भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक उमेदवार असावा असे वाटते. असे सांगितले प्रस्थापितांना मत दयायचे नाही हे या सर्वे मधुन स्पष्ट झाले.त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ओबीसी,बहुजन, भटक्या, विमुक्त, दलित,अल्पसंख्याक यांच्या पैकी १उमेदवार दिला पाहिजे. व एकाच उमेदवार यांच एकजूटीने ओबीसी ने काम केल्यास ओबीसी चा खासदार होणे. अवघड नाही.त्यामुळे वेळ वाया न घालता, लोकसभा लढा याची असेल तर उमेदवार कोण ? निवडणुकीत लागणारा खर्च येथुन ओबीसी उमेदवार यांना तयारी करावी लागेल.पण अवघड नाही.लोकसभा मतदारसंघात विधानसभा लढविणाऱ्या उमेदवारांना कमी नाही पण लोकसभा लढायाला प्रस्थापिता समोर ओबीसी,बहुजन, भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक उमेदवार पुढे आला पाहिजे.त्यामुळे ओबीसी,बहुजन, भटक्या, विमुक्त, अल्पसंख्याक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण न होता. तयारी केली पाहिजे. गेली ७५ वर्षे प्रस्थापित नेत्याचे समाजाचे आपण गुलाम होतो आता पण गुलामीच करायाची का?
असा प्रश्न नव्याने निर्माण होतोय. ओबीसी तील प्रस्थापित पुढारी समोरच्या उमेदवाराची जिरवण्या साठी आपल्याच पार्टीला धोका देऊन दुसऱ्या पार्टीला मदत करायला. निघालेत. त्यानी ओबीसी उमेदवार यांना मदत करावी.या दोघांच्या विरोधात ओबीसी उमेदवार उभा केला तर ओबीसी समाजातील खासदार होईल. दुसऱ्याला पायघड्या घालण्यापेक्ष!ओबीसी समाजाने लोकसभेला उमेदवार उभा करावा.व त्याला विजयी करावे,. अशी मागणी बहुजन व ओबीसी समाजातून होत आहे.