Breaking News
recent

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व गौरव पुरस्कार


श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) 

टाकळीभान:- ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान आयोजित ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या स्मृतिप्रत्यर्थ, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार कार्यक्रम सन-२०२४ उत्साहात पार पडला. संमेलनास सन्मा. मान्यवरांची अनमोल उपस्थिती व साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने हजेरी लक्षणीय होती. एक वैचारिक खाद्याची पर्वणी यानिमित्ताने ऐकावयास मिळाली तसेच कवी साहित्यिकांची मांदियाळी, त्यांच्या मनसोक्त मनाला भिडेल अशा कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले तर, मराठी भाषेची प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या अध्यापकांचा, साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाल्याने पुरस्कारार्थींच्या आनंदाला भरते आले... व त्याच बरोबर संमेलनाच्या पहिल्या सत्रा नंतर खमंग भोजनाचा आस्वाद व सूत्रसंचालकांच्या सूमधुर, लयबद्ध आवाजातील सूत्रसंचालनाने कार्यक्रमाचा स्वाद आणखी वाढविला... व त्यामध्ये कवी संमेलनातील कवींनी सुंदर कविता सादर करून संमेलनाच्या रुचीमध्ये आणखी भर टाकली.असे अविस्मरणीय , साहित्य संमेलन व मराठी अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला... 

याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील मानबिंदू असलेले ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक आ. लहुजी कानडे यांचे सूहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन पार  पडले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. संदीपजी सांगळे (अध्यक्ष-मराठी अभ्यास मंडळ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) संगमनेरच्या नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, मा. सभापती, संत साहित्य अभ्यासक डॉ. वंदनाताई मुरकुटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुरावजी उपाध्ये, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. किशोरजी सोनवणे(अध्यक्ष- मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव)जल अभ्यासक भिला सोनू पाटील, प्राचार्य टी. ई .शेळके,प्रा.कार्लस साठे सर, सचिनराव गुजर, अरुण पाटील नाईक, स्नेह प्रकाशचे संपादक प्रकाशजी कुलथे, ह भ प दत्तात्रय बहिरट महाराज, ह. भ. प .रवींद्र महाराज मुठे पर्यावरण मंडळाचे अनिल किसनराव लोखंडे सर, कवी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वसंतराव शेंडगे, माय मराठी अध्यापक संघाचे राधाकिसन दिघे सर आदी सह मान्यवर उपस्थित होते...कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे (समीक्षक- मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) यांच्या शुभेच्छा भाषणाने झाला. तर संमेलनाची सांगता संत ज्ञानेश्वर संस्थांनचे विश्वस्त ह.भ. प.ज्ञानोबा माऊली शिंदे यांनी आपल्या मधुर आवाजातून पसायदानाने झाली.. सर्वांचे आभार ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष संदीप पटारे, भैया पठाण, अक्षय कोकणे, रवींद्र पटारे, दिगंबर मगर, महेश शिंदे ,सर प्रशांत जाधव सर, बापूसाहेब साळवे ,भाऊसाहेब गव्हाणे, शिवाजी रणनवरे ,बाळासाहेब सावंत आदींनी परिश्रम घेतले... सर्वांच्या सहकार्याने एक अविस्मरणीय दुसरे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले...

Powered by Blogger.