दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनांप्रमाणे डीबी पथक प्रमुख मिलिंद जंवजाळ, विनायक मानकर, रवी झगडे, विनोद भोजने, राहुल ससाने, रवी सावळे, तसेच टाऊन बीट अमलदार पृथ्वीराज इंगळे, अनंता वराडे सुनील सपकाळ, उमेश भारसाकडे, तसेच ग्रामीण बिट अमलदार अमोल खोदील, काशीराम जाधव, संजीव जाधव, आकाश भोलनकर, शकील तडवी असे वेगवेगळे तीन पथके तयार करून जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये व दारूबंदी कायद्यान्वये खालील नमूद आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
त्यामध्ये 1) सचिन त्र्यंबक धोटे वय 40 वर्ष रा निमगाव याचे कब्जातून जुगाराचे नगदी 1430/-रु. एक वरली मटका अंक आकडे लिहिलेली चिठ्ठी 00/-, एक डॉट पेन किमती 5/रु. असा एकूण चौदाशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 2) त्याचप्रमाणे विलास उत्तम काटोने वय 52 वर्ष याचे कब्जातून नगदी 430 रुपये एक वरली मटका किमती 00, व एक डॉट पेन किमती पाच रुपये असा एकूण 435 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3) महादेव जयंतराव गव्हाड वय 47 वर्ष रा हिंगणे गव्हाड याचे कब्जातून जुगाराचे 460 रुपये, वरली मटका अंक आकड्याची चिट्ठी किमती 00 एक डॉट पिन किमती पाच रुपये असा एकूण 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे 4) कैलास जनार्दन सरदार वय 35 वर्षे रा. वडाळी याचे कब्जातून देशी दारू संत्रा 90 एम एल मापाच्या 35 नग शीशा थैली सह किमती 430 रुपयाचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला 5) त्याचप्रमाणे जयपाल अरुण सरदार या.वडाळी याच्या कब्जातून देशी दारू संत्रा 90 एम एल मापाच्या 40 नग शीशा किमती 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 6) आरोपी -1. इसा खान मुसा खान वय ५७ वर्ष रा. गैबी नगर नांदुरा 2. शेख युसुफ शेख मोहम्मद वय 55 वर्ष रा.वार्ड क्र 19 गोसिया मजीद गेबी नगर नांदुरा 3. नासीर खान अब्दुल्ला खान वय 41 वर्ष रा इनायती स्कुल गैबी नगर नांदुरा 4 शेख इमान शेख नांदुरा वर्ष 26 खुर्द 5. सलीम खान जबी उल्ला खान नांदुरा यांचे कब्जातून 01. जुगाराचे नगदी 2400/- रु व 52 ताश पत्ते किंमत 50 असा एकुण 2450/- रु चा जुगार माल जप्त करण्यात आला आहे.
तरी वरील प्रमाणे पोलीस स्टेशन नांदुरा येथील पथकांनी केलेल्या कारवाईबाबत आपले वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देणे विनंती आहे.