घुईखेड ते पंढरपूर पायदळ वारीचे ४ जुन रोजी होणार प्रस्थान
संत बेंडोजी बाबा पालखीची १३५ वर्षांची परंपरा
मनोज गवई चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :२१ जुलै ला पंढरपूरला पोहोचणार, ४७ दिवसांचा प्रवास घुईखेड ते पंढरपूर ९१० कि.मी. तर विनेकरांसोबत आळंदी चा २६० कि.मी. चा पायदळ प्रवासमंगळवारी घुईखेड मध्ये पार पडणार भव्य कार्यक्रमआषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. आषाढी पौर्णिमा पायदळ वारीेचे आयोजन चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असुन पंढरीसाठी ४ जुन रोजी रवाना होणार आहे. ही दिंडी २१ जुलै ला पंढरपूर येथे पोहोचणार असुन ४७ दिवसांचा हा प्रवास राहणार आहे. येत्या मंगळवारी (ता. ४) घुईखेड मध्ये भव्य कार्यक्रम पार पडणार असुन याकरिता अनेक नागरिक घुईखेडमध्ये येणार आहे. श्री परमपूज्य ब्रह्मलीन श्री संत बेंडोजी बाबा संस्थान घुईखेड यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तीर्थक्षेत्र घुईखेड ते पैठण, आळंदी ते पंढरपूर पदयात्रा दिंडी ४७ दिवसांचा भव्य दिंडी सोहळा ४ जुन ते २१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ४ जुन रोजी घुईखेड वरून दिंडी रवाना होणार असुन १७ जुन रोजी पैठण येथे पोहोचणार आहे. तर १८ जुन रोजी श्री क्षेत्र पैठण येथून दिंडीचे प्रस्थान होणार असुन २८ जुन रोजी आळंदी येथे पोहोचणार आहे. तर २९ जुन रोजी आळंदी येथून दिंडीचे प्रस्थान होणार असुन २१ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. २२ जुलै रोजी विनेकरांचे पंढरपूर काल्यानंतर दिंडी परतीच्या प्रवासात आळंदीकडे रवाना होणार आहे. या दरम्यान अनेक गावात दिंडीच्या थांबण्याची, नाश्ता, चहा व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील श्री. ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकुन २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणून श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे व या रथामागे विदर्भ प्रांतातून जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान हे १३३७ चे असुन सदर वास्तु ही अतिशय प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवितो. या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा ही एकुण १३५ वर्षापासुन चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकामध्येही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरतपणे यशस्वापणे पार पडत आहे.
वारीमध्ये सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी करावी
घुईखेड ते पंढरपूर पायदळ वारीमध्ये भक्तांना सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी प्रथम आपल्या नावाची नोंद संत बेंडोजी बाबा संस्थान, घुईखेड येथे करावी असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांसह इतरांनी केले आहे.