मान्सून पूर्व शहरातील नाल्यांची साफसफाई व बंद पडलेले पथदिवे चालू करण्याकरिता निवेदन
मनोज गवई चांदुर रेल्वे प्रतिनिधी
चांदुर रेल्वे : मान्सून पूर्व शहरातील नाल्यांची साफसफाई व बंद पडलेले पथदिवे चालू करण्याकरिता शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या घेऊन गावातील नागरिक नगरपालिकेला समस्यांची माहिती देण्याकरिता स्थानिक नागरिक मान्सून येण्याअगोदर शहरातील मुख्य नाले यांची साफसफाई करण्याकरिता व शहरांमधील काही पथदिवे चालू करण्याकरिता नगरपालिकेला निवेदन देण्यात आले काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार आहे परंतु आतापर्यंत सुद्धा स्थानिक नगर परिषदेकडून शहरातील तीन मुख्य नाल्यांची सफाई केलेली नाही. शहरातील मधोमध नागरी वस्तीला लागून असलेला या नाल्यांमध्ये काटेरी झुडपे, गवत कचरा काडी खूप आहेत. मागील काही वर्षापासून साफसफाई केलेला कचरा तसाच नाल्यामध्ये पडू नये तो आज पर्यंत सुद्धा काढला नाही. यामध्ये नाल्यांची साफसफाई केलेली नाही त्यामुळे मान्सूनचा पाऊस येणे अगोदर नाल्यांची साफसफाई जर झाली नाही पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.
यामध्ये आम जनतेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे लहान नाले मोठे नाले जाम झालेले आहे. याव्यतिरिक्त शहरातील मुख्य मार्ग बायपास मार्ग, वकील लाईन, वैभव रेस्टॉरंट हे मार्ग व आणखी अनेक भागातील पथदिवे सुद्धा बंद आहेत. याची साधी तसदी घ्यायला सुद्धा नगरपालिका तयार नाही. स्थानिक मूल्य नगर मधील सार्वजनिक विहिरीमध्ये सुद्धा नालीतील पाणी लिकेज असल्यामुळे मिलिंद नगर मधील नागरिक त्या विहिरीच्या पाण्यापासून वंचित आहेत मिरी नगर मधील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरीसुद्धा नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे हेच येथील नागरिकांची अपेक्षा आहे. निवेदन देतेवेळी सतीश देशमुख, सतीश चौधरी, देविदास राऊत, सुनील भाऊ वानखडे,पांडुरंग गाडेकर, अभिजीत तिवारी आदी नागरिक उपस्थित होते