सुधाकरराव वानखेडे सर यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
उमरखेड 31 मे 2024: श्री तेजमल गांधी कृषी विद्यालयाचे आदरणीय शिक्षक सुधाकरराव वानखेडे सर यांच्या निवृत्तीचा निरोप समारंभ दिनांक 31 मे 2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री. सुधाकर वानखेडे सर यांनी विद्यालयात 32 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली आहे.
समारंभाची सुरुवातीस पाहुण्यांचे स्वागत करून श्री सुधाकर वानखेडे सर यांना शाल, आहेर व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला, श्री तेजमल गांधी कृषी विद्यालयाचे सन्माननीय चेअरमन डॉ. विजयराव माने साहेब, ब्राह्मणगावचे सरपंच सन्माननीय परमात्मा अण्णा गरुडे, तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रकाशराव पेंटेवाड सर, माजी विद्यार्थी, पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते . या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पांडुरंग माने सर यांनी केले. तसेच 32 वर्षाच्या सेवापूर्तीवर श्री.अशोक शिरफुले सर, श्री.दतराव कदम सर प्राचार्य प्रकाशराव पेंटेवाड सर यांनी सरांच्या मागील आठवणींना उजाळा दिला व श्री सुधाकर वानखेडे सरांच्या पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉ.विजयराव माने साहेब यांनी आपल्या भाषणात श्री. सुधाकर वानखेडे सर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थी कोंडरवाड सर यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाबद्दल आठवणींना उजाळा दिला .आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
श्री. वानखेडे सर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. प्रशांत काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री. पांडूरंग माने सर यांनी केले.