श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव चा १०वी चा निका ९३ .४५ %
प्रतिनिधी उमरखेड:
नुकताच काल दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागला असून श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद संचलित श्री तेजवल गांधी कृषी विद्यालयाचा निकाल ९३ . ४५ % लागला आहे . विद्यालयातून प्रथम क्रमांक माने वैष्णवि पंजाबराव -94.60% व्दितीय क्रंमाक
रावते स्नेहल गजानन -92.20% तृतीय क्रमांक
जाधव सलोणि विश्वनाथ -91.80% चतुर्भ क्रंमाक
पतंगे गायत्री गजानन -91.20% यांना मिळाला आहे .
या विद्यालयातुन १६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये प्राविण्यसह 43 विद्यार्थी आले असुन प्रथम श्रेणीत ६१ विद्यार्थी आले असुन ३९ विद्यार्थी दितीय श्रेणीत आले आहेत तर १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार विजयराव चोंढीकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर सचिव अश्विनीताई चोंढीकर, चेअरमन डॉ . विजयराव माने, अँड अर्चनाताई माने, प्राचार्य पेन्टेवाड, समन्वयक सुधाकर वानखेडे तथा सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे