आ. श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, स्वतःवर झाडली गोळी
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा : दि.३१ जुलै रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा अंगरक्षक (बॉडीगार्ड) अजय शंकर गिरी यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास त्यांनी त्याच शस्त्राने स्वतःवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही दिवसापूर्वीच अजय गिरी यांची मुबंई येथून बुलढाण्यात बदली झाली होती. अजय गिरी हे बुलढाणा येथील पोलीस वसाहती मध्ये राहत असून ते आज कर्तव्यावर नसल्याची माहिती आहे. गोळी झाडली त्या वेळेस ते वसाहत मध्येच म्हणजे घरी होते. त्यांना तातळीने जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.