Breaking News
recent

कजगांव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्सवात साजरा.



प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगावं 

कजगांव ता भडगाव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती जय लहुजी ग्रुपच्या वतीने मतांगवस्ती नवेगाव याठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे उदघाट्न कजगांव चे लोकनियुक्त सरपंच श्री रघुनाथ महाजन यांनी केले .या कार्यक्रमाला कजगांव नगरीचे ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपसरपंच अक्षय मालचे ,शफी मन्यार ,मनोज धाडीवाल ,अनिल महाजन, भुरा आप्पा , अनिल टेलर ,दिनेश टेलर नाना मोरे ,मांगीलाल मोरे,धर्मराज हिरे ,पुंडलिक सोनवणे हजर होते.

 आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व मातंग समाज बांधवांना संविधान प्रचारक मांगीलाल मोरे यांनी संविधानिक मूल्याच्या आधारे प्रबोधन केले यात आपल्याला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व हक्क न विसरता त्यांचे पालन केले पाहिजे आणि आपला पारपरिक व्यवसाय करत असतांना आपल्या मुलांना शिकविले पाहिजे अस सांगायत आले.  या कार्यक्रमाला जगन साठे आण्णासाठे,आनंदा साठे,शरद साठे,प्रकाश साठे,जिभू साठे किरण साठे सुभाष साठे,दिलीप साठे ,नामदेव साठे समस्त मातंग समाज व गावातील नागरिक मोट्या संख्येने उपस्थित होते 



Powered by Blogger.