Breaking News
recent

भडगाव महसूल विभागणी तयार केलेले टीमने अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडले



प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगावं ता, भडगांव 

भडगाव दि 29 जुलै 2024 रोजी रात्री 10 वाजता भडगाव तालुक्यातील मौजे गिरड येथे अवैध वाळू रेती वाहतूक  करणारे हाफ बॉडी  डम्पर पकडले आहे. सदरचे वाहन पळून जात् असतांना महसुल विभागाचे कर्मचारी यांनी वाहनाचा पाठलाग करून मौजे अंतुर्ली फाटा जवळ तालुका पाचोरा येथे वाढू करणारे वाहन पकडून पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे डंपर मालकाचे नाव शुभम राजेंद्र पाटील उर्फ टिनू वडगाव टेक तालुका पाचोरा व डंपर वरून असलेल्या चालक  जुम्मा पिंजारी राहणार अंतुरली तालुका पाचोरा. अवधू वाळू रेती मुरूम खडी वाहतूक करणाऱ्यासाठी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांचे आदेशावरून पाचोरा प्रांत यांच्या सूचना अनुसार भडगाव तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे साहेब यांनी मार्गदर्शनाखाली तयार केलेले टीम -आर डी पाटील तलाठी पाचोरा, राहुल पवार तलाठी गिरड, अविनाश जंजाळे तलाठी भडगाव, आशिष काकडे तलाठी जारगाव, सुनील राजपूत ,तात्याराव् सपकाळ तलाठी नगरदेवळा अवैध वाळू रेती मुरूम खडी वाहतूक आढावा घालण्यासाठी या टीमचे सक्षम कामगिरी असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या शेतकरीवर्ग जनमानसात कौतुक होत आहे,






Powered by Blogger.