Breaking News
recent

नांदुरा येथील विदर्भ पटवारी संघ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे आजपासून सामुहिक रजा आंदोलन


नांदुरा: प्रशांत पाटील

    प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने विदर्भ पटवारी संघ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आजपासून सामुहिक रजा आंदोलनाचा अर्ज तहसीलदार नांदुरा यांना तलाठी संघाने आज दिला आहे.

        जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना च जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे. तसेच बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित मागण्याविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आठमुठे धोरण विरोधात प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी मा. विजेंद्रकुमार धोंडगे, जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात दि. १६.०७.२०२४ रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे.

    प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, प्रशासकीय बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशन घेऊन बदल्या करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात देणे, प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी /मं. अ. यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावीया शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला या आंदोलनाचा पाचवा टप्पा म्हणून प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने विदर्भ पटवारी संघ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे मागण्या मान्य होईपर्यंत आजपासून सामुहिक रजेवर जात आहेत. सदर सामुहिक रजा काळात सर्व शेतकरी बंधूना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सदर सामुहिक रजेचा अर्ज तहसीलदार नांदुरा यांना देतेवेळी तालुका अध्यक्ष डी.जे. खुराळे तालुका सचिव, ए.पी. आमले आजी माजी पदाधिकारी व नांदुरा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सभासद हजर होते.

Powered by Blogger.