उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत-खा. नागेश पाटील आष्टीकर
ग्रामीण प्रतिनिधी पंडित नरवाडे.
शिवसेना पक्षप्रमुख आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत श्री दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रक्तदान शिबिर आणि अनेक उपक्रम घेतले तसेच या दिवशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा वाढदिवस असल्यामुळे आपल्या दोन्ही नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी केली होती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्याचे अभिचिंतन केले त्यावेळेस खासदार अष्टीकर यांनी दैनिक अहिल्या राज विशेषांकाचे विमोचन केले.
खासदार नागेश पाटील आष्टीकर हे दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त श्री दत्त संस्थान भूरभुशि तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील गुरु चरणाचे दर्शन घेऊन आपल्या कामाला लागतात त्याप्रमाणे आज ते श्री दत्तात्रयाचे दर्शन घेऊन त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा आशीर्वाद मागून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर खासदार आष्टीकर हे जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत गेले त्यानंतर दुपारनंतर हादगाव येथील नियोजित केलेल्या रक्तदान शिबिराला सुमन गार्डन मंगल कार्यालयात पोहोचले रिमझिम पावसातही दिवसभर शिवसैनिकाचे रक्तदान सुरूच होते
तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन महाविकास आघाडीच्या वतीने अनेक नेते आले होते हादगाव चे आमदार माधवराव पाटील जवळगावकर किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक. माजी आमदार संतोष टारपे यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह येऊन खासदार अष्टीकर यांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख गोपीनाथ पाटील, संदेश देशमुख प्रवीण शिंदे यवतमाळ, ज्योतिबा खराटे शिवसेनेचे तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुखासह सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या