सोनाळा येथे नवदुर्गा महिला मंडळा चे वतीने वृक्षारोपण
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
**सोनाळा येथे नवदुर्गा महिला मंडळा चे वतीने वृक्षारोपण*.. सोनाळा येथील शिक्षक कॉलोनी येथे ८ ऑगस्ट रोजी नवदुर्गा महिला मंडळाचे वतीने वृक्षारोपण केले गेले.येथील माळी समाज सभामंडप व महिला बचत भवन समोरील भागात विविध वृक्षांचे रोपण केले.नवदुर्गा महिला मंडळ गेल्या वर्षापासून शिक्षक कॉलोनी येथे विविध उपक्रम राबवीत असते.या मधे दुर्गादेवी ची स्थापना या नवरात्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावेळी विश्व मांगल्य सभेच्या प्रतिनिधी विभागाच्या विदर्भ प्रांत संयोजिका सौ.अपर्णाताई कुटे यांचे हस्ते वृक्षारोपण केले गेले.नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.वैशाली बोदडे,जया वडशंकर,विजया पंधाडे,ज्योती भड,पार्वती घट्टे,निकिता भास्कर,शोभा गोतमारे, सुवर्णा मोदे,वैशाली अंभोरे,स्वाती मोदे,मेघा बगाडे,ज्योती डोरकर,संध्या मिरकुटे,रंजना भास्कर,अश्विनी तळोकार, सौ.गोतमारे,तांबेताई,सौ.चव्हाण,सौ.तरोडे सौ. लोखंडकार,सौ.केनेकर,सौ.भालेराव, आरती डांगे आदी सदस्या उपस्थित होत्या.