आदिवासी जननायक बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन तांड्यामध्ये निघाली बाईक रॅली, आ. कुटे यांचा सहभाग
(भगवंता चोरे जि.प्रतिनिधी)
सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या ग्राम वसाळी येथे राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपये खर्चाच्या आदिवासी जननायक बिरसा मुंडा स्मारकाचे उदघाटन जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने नवी वसाडी येथून बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य मिरवणूक काढून तसेच आदिवासी तांडा वस्तीत निमखेडी येथुन मोटर सायकल रॅलीला सुरवात झाली यांनंतर हडीयामाल, शिवनी, दयाल नगर, शिवाजी नगर, जुनी वसाडी येथे ठिक ठिकाणी बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांनी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे व भारतीय जनता
पार्टीचे जिल्हा, तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकीच्या समारोप प्रसंगी जुनी वसाडी येथील हनुमान मंदिरासमोर बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरसिंग गाडऱ्या हे होते. तर मंचावर आ. डॉ संजय कुटे, भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव ढोकणे, भाजपा ज्येष्ठ नेते भारत वाघ, अनुसूचित जाती जमाती सेलचे उपाध्यक्ष रंजीतसिंग डाबेराव, आदिवासी नेते हुसेन पालकर, गोपाळ कासदेकर, गिलदार डावर,
पोलीस पाटील जुम्मा पालकर, नवल राऊत, मेहताब डावर, सिकंदर बाबर, सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश दातीर जिल्हा सरचिटणीस भाजपा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुमसिंग डावर, मगन माळी, सुखलाल डावर, अमरसिंग डावर, रवि मांडलवी, अनिल जमरा, रमेश जमरा सह बहुसंख्य आदिवासी बांधव महिला भगिनीं तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते, बजरंगी उपस्थित होते. आभार प्रदर्शन खुमसिंग डावर यांनी केले.