शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप
मनोज गवई प्रतिनिधी
चांदुर रेल्वे
रेल्वे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यशवंत मंगलकार्यालय मध्ये कोरोना योद्धा अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा साडीचोळी देऊन जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष उत्तराताई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच शहरातील सर्पमित्र प्रशांत गावंडे,उमेश सूर्यवंशी, मंगल चव्हाण, यांचे शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आले,तर शनिवार रोजी शहरातील नेहरू प्राथमिक शाळा, शिवाजी प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, जिजामाता प्राथमिक शाळा, व उर्दू शाळा या शाळेत शिकणारे शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकांना, व शाळेत खिचडी बनवणाऱ्या महिलांना, तर काही शेतकऱ्यांना 1001 छत्र्याचे वाटप
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर वाघ, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित जगताप, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल होले,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास सूर्यवंशी, तर माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी प्रफुल कोकाटे, भीमा पवार,पंकज मेश्राम, सारंग देशमुख,संजय कोल्हे, अजय होटे, रुपेश पुडके राजू लांजेवार, अजिंक्य आरेकर, अनिस सौदागर गजानन चोरे, सागर गरुड, विलास मोठघरे, बंटी माकोडे, सतीश देशमुख राहुल कोरडे,दिनेश मारोटे,बबन वानखडे, शेख रशीद सोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते, शालेय विद्यार्थ्यांना छत्र्या मिळाल्या म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, तर आज 11 ऑगस्ट लां वाढदिवसा निमित्य तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे,