तब्बल वीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त
प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव
कजगाव तालुका भडगाव येथे दिनांक 23 रोजी शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वृषाली डीपीची केबल जळाल्याने तब्बल वीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कजगाव येथील वार्ड क्रमांक पाच येथील नागरिकांनी महावितरण संबंधित अधिकाऱ्यांना फोन द्वारे व तोंडी तक्रार देऊन देखील यासंदर्भात तात्काळ दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला, या एरियाची लाईट सतत रात्री बे रात्री जात असते वृषाली हॉटेलची डी पी वर जास्त लोड असल्याने संबंधित नागरिकांनी एस्ट्रा डी पी बसवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून असून देखील या संदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या असून याची दखल महावितरण अधिकाऱ्यांनी घेतले नाही यामुळे आचार्य व्यक्त केले जात आहे.
कजगाव येथे महावितरण संबंधित बऱ्याच तक्रारी असून देखील संबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, कजगाव येथे बऱ्याचशा प्लॉट एरिया मध्ये अजून पर्यंत विद्युत प्रवाह करणारे पोल नसल्याने नागरिकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन कजगाव येथील समस्या त्वरित सोडाव्या असे मागणी होत आहे, जळालेली केबल कजगाव येथे उपलब्ध नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील दस्केबर्डी येथून केबल आणून महावितरण कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भर पावसात विद्युत पुरवठा सुरळीत केला, वारंवार होणाऱ्या या तरासाला कंटाळून महिला व नागरिकांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास तिर्व आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आला आहे, कजगाव महावितरण संबंधित अनेक समस्या असून अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कजगावं गावाची समस्या सोडावी अशी मागणी कजगाव परिसरातून होत आहे ,