Breaking News
recent

पुण्यश्लोक अहिल्या संदेश यात्रेला प्रारंभ




 भगवंता चोरे (जिल्हा प्रतिनिधी)


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे त्रिशताप जयंती वर्ष आहे त्यांच्या कार्याविषयीचा संदेश ग्रामीण भागामध्ये पोहोचावा या हेतूने महाराष्ट्र धनगर समाज महासंघ यांच्या वतीने अहिल्यादेवी संदेशातील शुभारंभ श्री संत गजानन महाराज संस्थान इथून दिनांक 25 ऑगस्ट ला दुपारी एक वाजता करण्यात आला ही संदेश यात्रा जिल्ह्यातील शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद नांदुरा व खामगाव तालुक्यामध्ये जाऊन दिनांक 29 ऑगस्टला खामगाव तालुक्यातील चा समारोप होणार दरम्यान गावागावात या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे ही रथयात्रा उनकी गावात पोहोचताच गावातील समाज बांधवांनी तसेच भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अहिल्यादेवी संदेश यात्रेचे स्वागत केले. गावातील महिलांनी आपापल्या दारी रांगोळी काढून त्याचप्रमाणे दारी अहिल्यादेवी यांची प्रतिमा ठेवून संदेश यात्रेचे स्वागत केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या महान योगदानाबद्दल माहिती सांगितली तशीच त्यांची चरित्र मानवाला जीवन जगताना नक्कीच उपयोगी पडेल व हाच प्रांजळ हेतू या दिव्य संदेश यात्रे मार्फत जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे अहिल्यादेवी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री.श्रीराम पुंडे यांनी दिली यावेळेस गावातील बहुसंख्य लोक व महिला भजनी मंडळ वभारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered by Blogger.