Breaking News
recent

पत्रकार बापूराव नागवडे यांना अहिल्या पुरस्कार



श्रीगोंदा-दि.30-(प्रतिनिधी)-

काष्टी येथील श्री हंगेश्वर पायी दिंडी सोहळ्याच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा अहिल्या पुरस्कार जेष्ठ पत्रकार बापूराव नागवडे यांना नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

काष्टी येथील श्री हंगेश्वर पायी दिंडी सोहळा समितीच्या वतीने  विविध क्षेत्रातील मान्यवरांना अहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.पुरस्काराचे हे 12 वे वर्ष आहे.यावर्षीच्या अहिल्या पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार बापूराव नागवडे यांची निवड करण्यात आली.काष्टी येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

बापूराव नागवडे हे 1988 पासून पत्रकारीतेत कार्यरत आहेत.' नागवडे' कारखान्यात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.पत्रकारीतेतील योगदानाबद्दल त्यांचा अहिल्या पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.पुरस्कार प्रदान समारंभाला धोंडीबा राहिंज,डाॅ.अनिल कोकाटे,नवनाथ राहिंज,ग्रा.पं.सदस्य सुरज राहिंज,विलास टकले,बाळासाहेब राहिंज,ऋषिकेश राहिंज,भिमराव राशिनकर,विलास राहिंज,भाऊसाहेब लाळगे,राहूल राहिंज,अरुण दातीर,प्रेमराज राहिंज,रोहित साळवे, गोटू टकले, प्रकाश राहिंज आदिंसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Powered by Blogger.