करमोडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आनेराव तर उपाध्यक्षपदी अरविंद निलेवार.
हादगाव ग्रामीण प्रतिनिधी पंडित नरवाडे. .
बामणी फाटा येथून चार किमी अंतरावर असलेल्या करमोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवडीची मुदत संपल्याने नव्याने समिती गठीत करण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक कदम सर सरपंच ,शिवराज पचलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक सभा घेण्यात आली या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित झाले होते पालकांमधूनच सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष समितीची निवड करण्यात आली
यामध्ये अध्यक्ष म्हणून बालाजी संभाराव आनेराव उपाध्यक्ष म्हणून अरविंद निलेवार तर सदस्य म्हणून त्रिशरण वाघमारे, वामन कांबळे, सौ गंगासागर भुरके मंगलबाई शिंदे , शेख जावेद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सरपंच शिवराज पंचलिंगे, उपसरपंच बालाजी वाघमारे बालाजी वाघमारे शाळेचे मुख्याध्यापक कदम सर सर्व शिक्षक वृंद गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळी पालक शिक्षण प्रेमी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन सुनिल आनेराव पोलीस पाटील डॉक्टर गजानन आनेराव तंटामुक्ती अध्यक्ष किरण पाटील माजी सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते