शालेय व्यवस्थापन समिती गठित
हादगाव तालुक्यातील चेंडकापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी सोनाली ताई अशोक खरे तर उपाध्यक्षपदी सोनाली ताई गौतम पाईकराव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली मागील समितीचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. सदरील समिती बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष सोनाली ताई खरे उपाध्यक्ष सोनाली ताई पाईकराव सदस्य मीनाताई पाईकराव, प्रकाश खरे, गिरीश सोनटक्के, शिक्षण तज्ञ. पांडुरंग थोटे, या सर्व सदस्याची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया अतिशय शांतपणे पार पडली त्यावेळी गावातील सर्व नागरिक पालक वर्ग शिक्षणप्रेमी शाळेचे मुख्याध्यापक दस्तुरकर सर व सहशिक्षक पवार सर व पोलीस पाटील खरे व सरपंच सुमित्रा थोटे उपस्थित होते