भडगांव येथे बदलापूर घटनेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध
प्रतीनिधी : अमीन पिंजारी कजगावं
: बदलापूर येथील आदर्श शाळेत चार वर्षीय दोन विद्यार्थीनींवर शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला. सदर घटना अत्यंत निंदनीय मानव जातीला काळीमा फासणारी आहे. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. गुन्हा दाखल करण्यास देखील टाळाटाळ करण्यात आली. तसेच गोंडगाव ता. भडगांव, कोलकत्ता येथील मेडिकल विद्यार्थीनिंवर अत्याचाराची घटना घडल्या त्यांना अजून न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्र राज्यासह देशात वारंवार घडत आहेत.
कायदा व सुव्यवस्था यादृष्टीने अत्यंत धोक्यात आली आहे असे दिसते. आणि म्हणून या घटनेच्या निषेधाचे निवेदन पाचोरा - भडगांव शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात योजना पाटील, पुष्पा परदेशी, सिंधू वाघ, नसीम पठाण, हिना पठाण, गायत्री पाटील, रेखा शिससाठ, सुरेखा वाघ, शितल पाटील, मेघा पाटील, प्रतिभा पाटील, वैशाली पाटील, उषा मोरे, अनिता मोरे, प्रतिभा पाटील, बेबाबाई पाटील, आशा राजपूत, पूजा पाटील, वैशाली पाटील, कल्पना पाटील, निता भांडारकर, मनीषा पाटील आदी महिला पदाधिकारी समवेत दिपक पाटील, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, कैलास भावसार, माधव जगताप, चेतन रविंद्र पाटील, चेतन रंगनाथ पाटील, नरेंद्र राजपूत, नवल राजपूत, यश बिरारी, सुशील महाजन, रितेश महाजन, देविदास पाटील, सोमनाथ पाटील, संकेत सोमवंशी, दत्तात्रय पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भडगांव नायब तहसीलदार सुधीर सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सी. पी. पालकर यांना देण्यात आले.