ऐन निवडणुकीआधी प्रशांत डिक्करांना धक्का ! स्वाभिमानीचे विजय ठाकरेंचा भाजपच्या वाटेवर
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीआधी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण संघटनेचे माजी संग्रामपूर तालुकाध्यक्ष विजय ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ठाकरे यांनी त्यांच्या शेतकरी संघटनेचे सदस्यत्वाचा राजीनामा दिला, यानंतर आता भाजपचे राज्याचे नेते तथा जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्याहस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे राजेश मुयांडे, प्रकाश राहणे, दत्ता मारोडे, गोकूल दोरकर, शिवा ठाकरे, प्रज्वल कोठे, अमोल कुयटे आदी उपस्थित होते.