सोनाळा ग्राम पंचायत ही नगर पंचायत करण्यात यावी--- बच्चू कडू यांना निवेदन
प्रतिनिधी कुणाल बारब्दे
सोनाळा ग्राम पंचायत ही नगर पंचायत करण्यात यावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालय करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची दखल येत्या १८ सप्टेंबरपर्यंत न घेतल्यास आम्हाला आमच्या न्याय मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनाळा ग्राम पंचायत ही एक मोठी ग्राम पंचायत असून नगर पंचायत होण्यासाठी यापुर्वी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. ग्राम पंचायतची लोकसंख्या तसेच इतर प्रशासकीय बाबींचा विचार केला तर या ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होण्यास कोणतीही अडचण नाही. तरी सुध्दा या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तेव्हा सोनाळा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये तातडीने रूपांतर करण्यात यावे. तसेच येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुध्दा ग्रामीण रूग्णालय करण्यात यावे. आमच्या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आम्हाला नागरिकांच्या हितास्तव तथा न्याय मागणीसाठी आपल्या कार्यालया समोर येत्या १८ सप्टेंबरपासून नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल.
्रसदर निवेदनावर सोनाळा प्रहार सेवक आकाश उत्तमराव वानखडे, प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष गजानन रमेश शिरोडकार, प्रहार सेवक संतोष महादेव कुटे यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.