हादगाव तालुक्यात मुसळधार पाऊस अनेक गावांचा संपर्क तुटला.
हादगाव ग्रामीण प्रतिनिधी पंडित नरवाडे
हादगाव तालुक्यात सर्वदूर पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील पैनगंगा नदी कयाधू नदी लाखाडी नदी वाहत आहेत तर नाले ओढ्याला पूर आल्यामुळे करमोडी उंचाडा. पिंपरखेड मारलेगाव. चेंडकापूर ते बरड शेवाळा. यासह अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क आहे चेंडकापूर येथे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तलाठी इप्पर साहेब यांनी भेट देऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या पैनगंगा व कयाधू नदीला मोठा पूर आल्यामुळे शेतीतील सोयाबीन कापूस तूर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत
चेंडकापूर येथील स्मशानभूमी पूर्णताहा पाण्यात बुडालेली दिसत आहे तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी झाले असून जान जीवन विस्कळीत झाले आहे हादगाव शहरातील पंचशील शाळेजवळ असलेल्या नाल्याला मोठा पूर आल्यामुळे हादगाव ते नांदेड रस्ता तब्बल सहा तास बंद ठेवण्यात आला होता आतापर्यंत झालेल्या पावसापैकी सर्वात मोठा पाऊस असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे नदीकाठच्या शेतकऱ्याच्या पिकाचे व ओढ्याकडच्या शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने पूर ओसरल्यानंतर त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी