पाणावलेल्या डोळ्यांनी गौराईंना व गणरायाला निरोप
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
-सोन्याच्या पावलांनी माहेरी आलेल्या गौराईंला व श्री गणेशाला गुरुवारी (ता. १२) पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. विधीवत पूजा करून आणि त्यानंतर गौरींचे मुकुट हलवून ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे विसर्जन करण्यात आले. गौरींसह गणरायाचेही विसर्जन करण्याची परंपरा असलेल्या घरांमध्ये गौरींसह गणरायालाही ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत निरोप देण्यात आला. पाच दिवसाच्या बाप्पाला व गौराईला निरोप देण्यात आला