संघर्ष अनाथ गरजुंचा सोनाळा जि.प.सर्कल अंतर्गत आदिवासी गांव दौरा
कुणाल बारब्दे बोरखेड प्रतिनिधी
विठ्ठल वंदना मधुकरराव महाले संघर्ष अनाथ गरजुंचा संस्थापक अध्यक्ष यांचा आदिवासी भागातील १० गावात अनाथ गरजुंच्या समस्या जाणुन घेण्यासाठी दौरा पार पडला यात टुणकिसह वसाळी,हडियामहाल,रोहीणखिडकि,आलेवाडी,चिचारि,पिंगळि शेंबा,गुमटी,सालवण या गावातील अनाथ,गरजु व अपंग निराधार लोकांच्या समस्या जाणुन घेण्यात आल्या व ठीकठीकाणी अनाथ गरजुंना वह्या पेन वाटप करण्यात आले या प्रसंगी वसाळी व रोहीणखिडकी येथील मुख्याध्यापकांकडुन विठ्ठलदादा महालेंचा सत्कारही करण्यात आला यावेळी सर्व मित्र परिवार व आदिवासी भागातील मित्रमंडळ उपस्थीत होते.