आ. डॉ. संजय कुटे यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी-:
जळगांव जामोद विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांना आज मुंबई येथे उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्याहस्ते देण्यात आला. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे अधिकृत 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे हस्ते विधानभवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आ. संजय कुटे यांनी स्वीकारला. विधानसभेतील आ.डॉ. संजय कुटे यांच्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले. ज्यांच्या आशीर्वादाने विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली त्या जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सर्व माय-बाप मतदार बंधू भगिनींना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला...