बोरखेड गावात बैलपोळा साजरा
सोगडा ग्रामपंचायत ला लागणारे बोरखेड गावात आज पोळा साजरा झाला. बैल पोळ्याचा आनंद हा शेतकऱ्यांना च नसतो तर गावातील सर्व नागरिकांना असतो. सर्वांनी सकाळीच बैल नदीवर नेऊन बैलांना स्वच्छ पद्धतीने धुवून आणले. सजावट केली,सर्व कडे बैलच-बैल अतिशय चांगल्या पद्धतीने बैलांना सजवलेले फुग्याचा समावेश पण खूप मोठया प्रमाणात तसेच बैलाचा मान म्हणजे सजवलेला दारका बैल, आनंदाने वाजत गाजत बैल पोळा साजरा केल्या गेला. दिपक देवलाल बारब्दे याचा दाराका बैल होता दरक्या बैलाची मिरवणूक संपूर्ण गावात मुरवणूक काढण्यात आली.अतिशय उत्सवात बैल पोळा साजरा करण्यात आला.