कजगाव येथे बैल पोळा उत्साहात साजरा,अनेक वर्षांची परंपरा राखत आगळावेगळ्या पद्धतीने बोली लावून फोडला पोळा
प्रतीनीधी: आमीन पिंजारी कजगाव
कजगाव ता.भडगाव :येथे अनेक वर्षाच्या परंपरे प्रमाणे यंदाही बैल पोळा आगळावेगळा पद्धतीने साजरा करण्यात आला गावातील सावता माळी चौक व शनी महाराज चौकामध्ये दरवर्षी प्रमाणे बैल पोळा साजरा करण्यात आला सुरवातीला शनी महाराज चौका मधील बैल पोळा फोडण्यात आला व लगेच सावता माळी चौक भागातील बैल पोळा फोडण्यात आला दोन्ही ठिकाणी गावातील सर्वच शेतकऱ्यांचे बैल सजवून व विविध साज चढवून एकत्रित आणण्यात आले होते जुने गावातील शनी महाराज चौकातील पोळा नाना पुंडलिक पाटील यांनी बोली पद्धतीत सहभाग घेवून ६२०० रुपयात पोळा फोडून बैल पोळ्याचा मान मिळवला तर बैलांच्या शर्यतीत भीकन खंडू पाटील यांच्या बैलाने शर्यत जिंकल्याने त्यांना ५०० रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले तर सावता माळी चौक भागातील बोली पद्धतीने फुटणारा बैल पोळा जय भद्रा ग्रुपच्या वतीने बोली लावून फोडण्यात आला समाधान पवार,अमोल सोनार,नरेश राजपूत, बंटी चौधरी,शिवाजी पाटील, दीपक महाजन,दिनेश भोई,रवींद्र माळी, ह्या तरुण मित्रांनी पाच हजार चारशे 51 रुपये बोली पद्धतीत सहभाग घेवून मानाचा बैल पोळा फोडून सहभाग घेतला होता मोठ्या उत्साहात दरवर्षी प्रमाणे बैल पोळ्यात ग्रामस्थांनी सहभाग घेतला यावेळी ग्रामस्थांची गर्दी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून बैल पोळ्याचा आनंद घेतला होता यावेळी भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने व कजगाव पोलिस मदत केंद्राच्या वतीने सहायक फौजदार छबुलाल नागरे,पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र विसपुते, किशोर सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला त्यांना पोलिस पाटील राहुल पाटील यांनी सहकार्य केले