कजगाव येथे यात्रेनिमित्त संदल व सादर मिरवणूक उत्सवात
प्रतिनिधी आमिन पिंजारी
कजगाव येथे भाई मिया शहा बाबाचा उरूस निमित्त संदल मिरवणूक व चादर मिरवणूक काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे पोळ्याच्या दिवशी संदल व चादर मिरवणूक केली जाते दुसऱ्या दिवशी (उरूस) यात्रा ला सुरुवात होते , यात सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन चादरीचे दर्शन घेतात व भाईमिया शहा बाबाचा दर्गावर चादर चढवून दुवा पठण करतात दरवर्षी संदल व चादर चा मान प्रत्येकाला देण्यात येतो यावर्षी चादर संदल मिरवणूक शौकत पिंजारी यांच्या घरापासून काढण्यात आली खऱ्या अर्थाने या यात्रेनिमित्त गावात हिंदू मुस्लिम एकोपाचे दर्शन होते यावेळी गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते