Breaking News
recent

शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गुड टच व बॅड टच बाबत प्रात्यक्षिक



 नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील

बुलढाणा जिल्हा पोलीस दल यांचे मार्फतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बदलापूर तसेच आपल्या आसपास घडणाऱ्या अल्पवयीन मुला मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे घटने संदर्भाने जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक व नागरिक यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे सदर उपक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक 04/09/2024 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथील चिडीमार विरोधी पथक च्या प्रमुख महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती ढाकणे यांनी जंगली महाराज इंग्लिश स्कूल नांदुरा येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गुड टच व  बॅड टच बाबत प्रात्यक्षिक देऊन शाळेत, शिकवणी वर्ग ,घरी अथवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणी त्यांची छेडछाड करत असेल तेव्हा काय काळजी घ्यावी, सोशल मीडियाचा वापर कसा करावा ,अनोळखी व्यक्ती सोबत जाऊ नये किंवा कुणी अनोळखी व्यक्तीने काही खाण्यासाठी दिल्यास खाऊ नये, काही अडचण आल्यास पोलीस मदतीसाठी 112 डायल नंबर चा वापर कसा करावा,अशा वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी, यांना देखील शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसून याबाबत शिक्षकेतर कंत्राटी कर्मचारी नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,अथवा खबरदारी, त्यांचे पोलिसांकडून घ्यावयाचे चारित्र्य प्रमाणपत्र, तसेच शाळांमध्ये तक्रारपेटी लावणे व इतर  सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सदर उपक्रम हा पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे , पोका खंडारे  यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पार पाडला आहे. तसेच यापुढे सुद्धा पोस्ट हद्दीतील शाळांना भेटी देऊन अशा प्रकारचे कार्यक्रम करीत आहोत

Powered by Blogger.