उमरखेड महामार्ग बंद पैनगंगेच्या पुलावरून पाणी
हादगाव प्रतिनिधी पंडित नरवाडे.
उंचाडा. करमोडी पिंपरखेड मार्लगाव चेंडकापूर गावात पाणी शिरले, पुरात अडकलेल्या शेतकऱ्याची सुटका सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ मराठवाडा सीमेवर नांदेड उमरखेड महामार्ग रस्त्यावर असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे तर तालुक्यातील उंचाडा येथील 20ते25 शेतकरी आपल्या गुराढोरांना सारापाणी करण्यासाठी कयाधू नदी ओलांडून पलीकडे गेले होते त्यादरम्यान कयाधू नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आखाड्यावर अडकून पडले होते ही बाब हदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार विनोद गुंडमवार त्यांना कळतात त्यांनी ताबडतोब हिंगोली येथिल एस आर डी एफ टीम उंचाडा येथे दाखल केली व पुरामध्ये अडकलेल्या आखाड्यावरील अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले .
उंचाडा व करमोडी पिंपरखेड चेंडकापूर पुराच्या पाण्याने संपूर्ण गावाला वेडा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे घरातील संसार उपयोगी सामानाचे नुकसान झाले आहे आज दिवसभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढतच होती दुसरीकडे भानेगाव येथील पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे अनेक घराचे नुकसान झाले त्यावेळेस पूरग्रस्त विभागातील सुरक्षित जागी हलविण्यात आले इकडे पैनगंगा नदीची पाणी पातळी वाढतच असल्यामुळे नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला तालुक्यातील कोथळा. वाटेगाव . गोरलेगाव हारडफ धोतरा रावणगाव या गावांचा ओढ्यांच्या पुरामुळे तालुक्याचा संपर्क तुटला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कमान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ओढ्याच्या पुराचे पाणी गेल्यामुळे नांदेड उमरखेड महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता